शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते कमल हासन यांचा ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 20:22 IST

भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीवरुन अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. 

मुंबई, दि. 15 -  भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीवरुन अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. अभिनेते कमल हासन यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपरस्थित केला आहे. त्यांनी ट्विटरवर, जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात एखादी दुर्घटना किंवा भ्रष्टाचार झाला, तर राजीनामा दिला पाहिजे. असे असताना कोणत्याही पक्षाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागितला, असा सवाल केला आहे. तामिळनाडूमध्ये गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. दरम्यान, कमल हासन यांनी तामिळनाडूतील अनेक नेत्यांवर आरोप केले आहे. तसेच, येथील राजकीय घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. मात्र, यावेळी कमल हासन यांनी थेट मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, गेल्या काही दिवसांपासून कमल हासन राजकीय वर्तुळात चालणा-या घडामोडींवर जास्त ट्विट करताना दिसून येत आहे. यावरुन त्यांची राजकारणात जाण्याची शक्यता असल्याचेही वर्तविण्यात येत आहे. 

याचबरोबर, कमल हासन यांनी आणखी एक ट्विट केले असून यामध्ये त्यांनी तामिळनाडू राज्य अधिक चांगले बनविण्याचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. माझा आवाज बळकट करण्याची कुणामध्ये हिम्मत आहे, असा सवाल करत DMK, AIADMK आणि इतर पक्ष मदत करु शकतात. शिवाय पक्षांकडून मदत नाही मिळाला, तर दुसरा मार्ग शोधू, असे म्हटले आहे. 

कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात ट्विटर वॉरचेन्नईमध्ये दोन नावाजलेल्या व्यक्तींची घरं एकमेकांपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मात्र या दोघांमध्ये शत्रू देशांसारखं नातं आहे. ते दोघे दुसरे, तिसरे कोणी नसून कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी आहेत. एक राज्यसभेचे खासदार आहेत, तर दुसरे दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये ट्विटर वॉर झाल्याचे पाहायला मिळाले.